Take a fresh look at your lifestyle.

फरहान अख्तरचा ‘तुफान’ बॅन करण्याची मागणी जोरावर; युजर्सकडून ‘लव्ह जिहाद’च्या प्रसाराचा आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर यांचा आगामी चित्रपट ‘तुफान’ गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मात्र सध्या सांगायची बाब अशी कि हा चित्रपट प्रदर्शन होण्याआधीच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरवर हा चित्रपट बॅन करण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. अनेक युजर्सकडून या चित्रपटावर लव्ह जिहादचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट येत्या १६ जुलै २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे कि, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित देखील झाला नाही तर लोक बायकोत तुफानचा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहेत.

सध्या सोशल मीडिया ट्विटरवर #BoycottToofan हा हॅशटॅग चांगलाच जोरदार ट्रेंड होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर त्यात एक मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर लोकांनी तीव्र आपत्ती दर्शवली आहे. अनेकांनी हे ‘लव्ह जिहाद’चा प्रसार करीत आहेत असा गंभीर आरोपही लावला. कोणी म्हटलं, ‘बॉलिवूडच्या निशाण्यावर फक्त हिंदूचं का? आणि लव्ह जिहादलाही प्रोत्साहन देत आहेत. तर हिरॉइन नेहमी हिंदूच का असते. काय हे मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूना निशाणा बनवत आहेत.?’

याशिवाय काहींनी, ‘१६ जुलैला फरहान अख्तरचा तूफान चित्रपट येत आहे, त्याने CAA चा विरोध केला होता. आता आपली वेळ आहे. त्याच्या चित्रपटाचा विरोध करायची.’ अश्या पद्धतीने युजर्सने ट्विटच्या माध्यमातून फरहान आणि बॉलिवूड याना एकत्र निशाण्यावर घेतल्याचे दिसत आहे. याबाबत अनेक लोकांनी आपली निरनिराळी मत मांडून ट्विटरवर ट्विट करीत आपला संताप व्यक्त केला आहे.

तुफान या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तरसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन अगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज हे कलाकार अन्य महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. तर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.