Take a fresh look at your lifestyle.

प्लास्टिक सर्जरीने घेतला जीव; वयाच्या 21’व्या वर्षीच अभिनेत्रीचा जगाला निरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी सिनेसृष्टीतून येतेय. कन्नड मालिका क्षेत्रात छोट्या पडद्यावर काम करून चाहत्यांच्या मनात आपली जागा मिळवलेली प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राज हीच निधन झाल्याचे हे वृत्त आहे. आपल्या अभिनयानं घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री चेतना राज हि फक्त आणि फक्त २१ वर्षाची होती. अवघ्या २१ व्या वर्षी अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतल्यानं अभिनय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पण खरी खळबळ तर मूळ कारण जाणून घेतल्यानंतर उडाली. प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर चेतनाचा मृत्यू झाल्याची घटना घालायचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयात टीव्ही अभिनेत्री चेतना राज हीचं निधन झालं आहे आणि तिच्या मृत्यूचं कारण अतिशय भीषण आहे. बोललं जात आहे की, रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिचं निधन झालं आहे. हि बातमी ऐकून सर्वानांच मोठा धक्का बसला आहे. या बातमीने मनोरंजन विश्वासह तिच्या सर्वसामान्य चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनांक १६ मे २०२२ रोजी सकाळी चेतनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर ‘फॅट फ्री’ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरीरात बदल जाणवू लागले. दरम्यान फुफ्फुसात पाणी शिरल्यामुळे संध्याकाळी तिची तब्येत खालावली आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, चेतनाचा मृतदेह हा अद्याप बंगळुरुमधील रुग्णालयात आहे. तर शव विच्छेदन प्रक्रियेसाठी तिचा मृतदेह हा रमय्या रुग्णालयात नेण्यात येणार आहे अशी माहिती मिळतेय. चेतना राजच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबाकडून जवळील पोलिस ठाण्यात रुग्णालय समितीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असे सांगितले जात आहे. तिचे कुटुंबिय बेंगुळुरुमधील अबेगेरेमध्ये राहतात. चेतनाने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र ‘गीता आणि दोरेसानी’ या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.