Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडच्या देसी गर्लने सांगितले मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्व; व्हिडीओ झाला व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री प्रियांका चोप्रा हि नेहमीच तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. तीने निक जोनास याच्याशी लग्न केल्यानंतर ती विदेशी सुनबाई झाली असली तरीही तिचा देसी अंदाज तिने कायम टिकवला आहे. प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न करून दोन्ही संस्कृतींचा मान ठेवला.

इतकेच काय तर लग्नानंतर अनेकवेळा प्रियांकाच्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा दिसलं आहे. यानंतर आज प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खरं तर ज्वेलरी ब्रॅंडचा आहे. पण यातून तिने मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे विशेष महत्व सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

या व्हिडिओच्या माध्यामातून प्रियांका चोप्रा- जोनास म्हणते कि, मी पहिल्यांदा माझं मंगळसूत्र घातलं होतं तो दिवस मला आजही आठवत आहे. तो क्षण माझ्यासाठी तेव्हाही खास होता आणि आजही खास आहे. कारण आपण सगळे याचे महत्त्व जाणतो आणि याच वातावरणात आपण वाढलो आहे.

माझ्यासाठी तो क्षण खूप महत्त्वाचा होता. मी जरी स्वतःला मॉर्डन म्हणवत असले, तरी त्यावेळी मला त्याचं महत्त्व समजत होते. एक आधुनिक स्त्री म्हणून मला त्याचे महत्त्व समजते, कळते.

पुढे म्हणाली की, “मला मंगळसूत्र घालायला आवडते की, हे देखील पितृसत्ताक आहे? असे माझ्याबद्दल बोलत असलात तरी, मी ती पिढी आहे, जी मध्यभागी आहे. ज्यांना परंपरा जपायची आहे आणि वडीलधाऱ्यांच्या परंपरा पुढे न्यायच्या आहेत. तुम्ही कोण आहात हे तुम्ही समजून घेत आहात.

तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करता आणि पुढच्या पिढीतील मुली हे वेगळे कसे करू शकतात ते पाहा. याशिवाय व्हिडिओमध्ये तिने मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचा वापर आणि महत्त्व सांगताना म्हटले कि, “काळ्या मण्यांचा वापर मुळात वाईटापासून दूर ठेवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी केला जातो.”