Take a fresh look at your lifestyle.

‘तूझा फुटबॉल झालाय…’ म्हणणाऱ्यां ट्रोलर्सला धनश्रीने दिलं उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर होऊन गेलेली लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ हि आजही लोकांच्या आठवणीत आहे. नुसती मालिका नव्हे तर मालिकेतील पात्रे देखील आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री धनश्री कडगावकरच्या घरी काही दिवसांपूर्वी लहानग्या पाहुण्यांचे आगमन झाले. तिने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. प्रेग्नेंसीमुळे तिच्या शरीरात अनेक बदल झाले. दरम्यान तिचे वाढलेले वजन हे इतके कारण ट्रोलिंगसाठी पुरेसे होते. एकाने तर तुझा फुटबॉल झालाय अशी कमेंट करीत धनश्रीला ट्रोल केले. यावर धनश्रीने काहीही वादविवाद न करीता तिला ट्रोल करणार्यांना तिच्या चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

प्रेग्नेंसीच्या काळात धनश्री फोटोशूटमुळे प्रचंड चर्चेत रहायची. तसेच प्रेग्नेंसीनंतरही धनश्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. मात्र तिचे वाढलेले वजन पाहून नेटकरी तिला सतत ट्रोल करत आहेत. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना तिच्या चाहत्यांनीच उत्तर दिल्यामुळे धनश्रीने इन्स्टा स्टोरी पोस्ट करत सौम्यपणे ट्रोलर्सला चपराक दिली आहे.

Dhanashree's Insta Story

धनश्री कडगावकरने इंस्टाग्राम स्टोरीवर इंस्टाग्रामवरील फॉलोव्हर्सचे आभार मानले आहेत. सोबतच अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला तिच्यासोबत तिच्या चाहत्यांनी रिपोर्ट केले आहे. यावेळी तिने पोस्टमध्ये मी फुटबॉल झाले अशी कमेंट करणाऱ्यांना सुद्धा माझ्या फॉलोअर्सपैकी अनेकांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तुमच्या सर्वांचे मनापासून आभार’ असे म्हटले आहे. प्रेग्नन्सीनंतर वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रीस ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेक अभिनेत्रींना या गोष्टीसाठी ट्रोल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.