Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा पुशअप मारण्यासाठी धर्मेंद्रनी बोलावले सनीला… धरम यांनी ट्विटरवर उघडले हे गुपित

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतो. आता धर्मेंद्रने एक फोटो शेअर करुन आपल्या चित्रपटाशी संबंधित एक अतिशय रंजक रहस्य सांगितले आहे. १९८२ मध्ये धर्मेंद्रचा ‘मैं इंतकाम लूंगा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये एका सीनचे चित्रीकरण केले जाणार होते, पण धर्मेंद्र हे सीन करू शकले नाहीत, त्यानंतर या सीनसाठी सनी देओलला आणण्यात आले.

 

बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्रने आपल्या ताज्या ट्विटमध्ये याचा खुलासा केला आहे. धर्मेंद्रने लिहिले आहे की,’मैं इंतकाम लूंगा’ मधील या शॉटसाठी सनीला बोलावण्यात आले होते. एका हाताने पुश-अप,मला जमत नव्हते. अशाप्रकारे, धर्मेंद्रला एका हाताने पुशअप करावे लागणार पण ते ते करू शकले नाहीत, म्हणूनहा सीन धर्मेंद्रऐवजी सनी देओलने केला होता.

बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या टी.रामाराव दिग्दर्शित ‘मैं इंतकाम लूंगा ‘ मध्ये रीना रॉय आणि अमरीश पुरी यांनीदेखील काम केले होते. त्यावेळी सनी देओल २६ वर्षांचा होता. सनी देओलचा पहिला चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

 

Comments are closed.

%d bloggers like this: