Take a fresh look at your lifestyle.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धर्मेंद्र यांचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाले, मित्रांनो..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना अलीकडेच प्रकृती अस्थैर्यामूळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती मिळतेय. इतकेच नव्हे तर, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र आपलया चाहत्यांना सांगत आहेत कि, कोणतीही गोष्ट आपल्या क्षमतेहून अधिक करू नका. कारण याचा मी धडा घेतला आहे. या व्हिडिओवर धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओलने ‘लव्ह यु’ अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.

त्याचे झाले असे कि, धर्मेंद्र यांना शूटिंगदरम्यान अचानक पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. खरतर यावेळी त्यांच्या पाठीचा स्नायू खेचला गेल्याने त्यांना वेदना होत होत्या आणि म्हणून वेदनांची तीव्रता पाहता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता धर्मेंद्र यांना पाठदुखीचा त्रास असह्य झाल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयाकडून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याविषयी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयांकडून माहिती देण्यात आली आहे. तर धर्मेंद्र यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना प्रकृतीची माहिती दिली आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेते धर्मेंद्र म्हणाले कि, “मित्रांनो, कोणतीही गोष्ट अती करू नका. तुमच्या क्षमतेला ओळखा. मी अती केल्यानेच असं झालं आणि आता मला चांगलाच धडा मिळाला आहे. अती व्यायाम केल्याने माझ्या पाठीच्या स्नायूंवर अधिक ताण पडला. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. हे सर्व खूप कठीण होतं.

पण तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी पुन्हा सुखरुप घरी परतलोय. त्यामुळे माझी काळजी करू नका. मी आता माझी अधिक काळजी घेईन.” या व्हिडिओला त्यांनी “मित्रांनो, मी धडा शिकलो आहे, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. येत्या काळात धर्मेंद्र २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘अपने’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहेत. सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ते व्यस्त आहेत.