Take a fresh look at your lifestyle.

धोनी बनवणार सिनेमा; ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन क्रिकेट टीमची बाजू उत्तम पेलणारा आणि क्रिकेटच्या मैदानात फक्कड छाप उमटवलेला लाडका एमएस धोनी आता सिने क्षेत्रात प्रवेश करतोय. काही काळापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. यानंतर तो आता फ्रेंचायजी क्रिकेटमधूनही तो निवृत्ती घेऊ शकतो अशी चर्चा आहे. आजही धोनी आपल्या संघासाठी त्यांच्या गरजेनुसार खेळतो. कारण प्रतिस्पर्धी संघांसाठी धोनी एक वादळ आहे. ज्याला खेळी कशी असावी याचे उत्तम ज्ञान आहे. हाच धोनी आता सिने सृष्टीत आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्याने तामिळ प्रोजेक्टची निवड केली असून या चित्रपटात मुख्य नायिका म्हणूनही दाक्षिणात्य अभिनेत्रीचीच निवड केली आहे. क्रिकेट क्षेत्रातील त्याची कामगिरी आणि चेन्नई सुपर किंग्स टीममुळे एम एस धोनीची तामिळनाडूत मोठी क्रेझ आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेत धोनीने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराला चित्रपटात मुख्य भूमिकेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीच्या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेत असल्याचे वृत्त चेन्नई टाइम्सने दिले आहे.

याशिवाय, मे महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे अशीही माहिती या वृत्तातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नशीब आजमावणारा धोनी पहिला क्रिकेटपटू नसून याआधी हरजभज सिंग अर्थात भज्जीनेसुद्धा डिक्कीलूना मध्ये काम केलं होतं. अद्याप धोनी त्याच्या तामिळ चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये स्वतः काम करणार आहे का नाही याबाबत कोणतेही वृत्त नसले तरीही तो या चित्रपटाची निर्मिती करतोय अशी माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आता धोनी का नाम भी होर्डिंग पे दिखेंगा.. Mind It..