Take a fresh look at your lifestyle.

शाहरुखच्या ‘मन्नत’ची हिरेजडित नेमप्लेट गायब..? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या अभिनयासह खाजगी आयुष्यातील अनेक बाबींमुळे गेल्या वर्षभरात चर्चेत राहिला आहे. जस कि त्याचा मुलगा आर्यन खान याच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकणे आणि त्याचा बंगला मन्नतची नेमप्लेट बदलणे. सध्या या दोन्ही चर्चेच्या विषयांना वेगळच वळण मिळालं आहे. एक म्हणजे आर्यनला NCB कडून क्लीनचिट मिळाली आहे आणि दुसरी म्हणजे मन्नतची हिरेजडित नेमप्लेट अचानक गायब झाली आहे. आता हि नेमप्लेट काढली का कुणी चोरली ते काही कळेना. पण सोशल मीडियावर याची चर्चा जोरात चालू आहे. तसा फोटोही व्हायरल झालाय. पण या व्हायरल फोटोमागील सत्य काय ते आपण जाणून घेऊया.

शाहरुखचा ‘मन्नत’ गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. त्याचे अनेक चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या एका झलक साठी याच मन्नत बाहेर अख्खा अख्खा दिवस उभे राहतात. कधी मग शाहरुख नसला तरी त्याच्या बंगल्याला भेट देणं त्याच्या चाहत्यांसाठी फार विशेष बाब आहे. अलीकडे शाहरुखने आपल्या बंगल्याची नेमप्लेट बदलली होती. तब्बल २५ लाखाची नेमप्लेट या बंगल्यावर झळकत होती. त्यामुळे चकाकणारा मन्नत चांगलाच चर्चेत आला होता. पण आता हि महागडी नेमप्लेट गायब झाल्यामुळे ती गेली तर गेली कुठे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सध्या या विना नेमप्लेटच्या मन्नतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

याविषयी सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. पण मीडिया रिपोर्टनुसार, या २५ लाखाच्या आयकॉनिक नेमप्लेटमध्ये काही डायमंड बसवलेले होते. त्यातील काही डायमंड गेल्या काळात पडले होते. यामुळे नेमप्लेटचा पूर्ण लूक बिघडला होता. शाहरुखची पत्नी गौरी खानं हिने स्वतः हि नेमप्लेट डिझाईन करून घेतली होती. त्यामुळे हि नेमप्लेट फार महत्वाची आहे. म्हणूनच आता पडलेले डायमंड पुन्हा बसवून त्या नेमप्लेटची दुरुस्ती करुन घेण्यासाठी आपल्या स्टाफला ती नेमप्लेट काढण्याचे आदेश त्यांनी दिले होते. पण या नेमप्लेटच्या अशाप्रकारे गायब होण्यामुळे आणि मुख्य म्हणजे त्याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर चर्चाना उधाण आले होते.