Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध गायक मिका सिंगने उरकले लग्न, खरंच कि काय? ; गुरुद्वारातील फोटो केला शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गायक मिका सिंग व अभिनेत्री आकांशा पुरी यांचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून अनेकजण संभ्रमात पडले आहेत की गुरुद्वारामध्ये मिकाने आणि आकांक्षाने लग्न केले कि काय? असेच वाटते. इतकेच नाही तर फिलींग ब्लेस्ड अशी कॅप्शन दिल्यावर कुणीही अचंबित होईल. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अफेर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आजपर्यंत दोघांनीही ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सांगितले नव्हते. मात्र सतत सोबत दिसल्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या.

आता गुरुद्वारामधील दोघांचा एकत्र फोटो पाहून त्यांचे लग्न झाल्याची चर्चा जोर धरत आहेत. फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे आकांक्षाला लग्नाविषयी विचारले असता, तिने या फोटोचे सत्य सांगितले आहे. फोटोवरुन लग्न झाल्याचे निकष लावणा-यांना आकांक्षाने नेमके खरे काय? हे न ताणता सांगितले.

मात्र दोघांचे लग्न झाले नसल्याचे तिने म्हटले आहे. सध्या सुरु असणा-या चर्चा या केवळ अफवा आहेत, असे ती म्हणाली. २०१९ मधील बिग बॉस सीजन १३ मधील स्पर्धक पारस छाब्रासह असलेल्या अफेअरमुळे आकांक्षा चांगलीच चर्चेत होती. मात्र या दोघांचे नाते फार काळ काही टिकले नाही. काही वैयक्तिक कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचेही समोर आले होते.आकांक्षाने दिलेल्या माहितीवरून मिका व ती अजूनही अविवाहीत आहेत हे कळते.

दरम्यान मिका सिंगने सांगितले, “मला लग्न करायचं असून त्यासाठी मी योग्य मुलीचा शोध घेत आहे. कदाचित ‘इंडियन प्रो-म्युझिक लीग’ कार्यक्रमादरम्यानच मला सुयोग्य नवरी सापडेलही, पण सलमान खानने लग्न केल्यानंतरच मी लग्न करणार आहे. ही माझी अट आहे. तोपर्यंत मी सिंगल जीवन मजेत जगणार आहे. साजिद भाईने आधी म्हटल्याप्रमाणे सलमान भाईनंतर बॉलीवूडच्या जगात केवळ मीच अविवाहित तरूण असेन. मला हे बिरूद जास्तीत जास्त काळ मिरवायचं आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.