Take a fresh look at your lifestyle.

‘पुष्पा’ने दुखावल्या पोलिसांच्या भावना..?; गृहमंत्र्यांकडे चित्रपटावर बंदी आणून अभिनेत्यावर कारवाईची मागणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही आठवड्यांपासून बॉक्स ऑफिस आणि ओटीटीवर एकच चित्रपट गाजतोय आणि तो म्हणजे पुष्पा. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा- द राइज’ चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. अगदी समीक्षकदेखील याला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. पण यानंतर आता हा चित्रपट वादात अडकतो का काय असे वाटत आहे. कारण शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी पोलिसांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushpa (@pushpamovie)

‘पुष्पा’ या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल अशी अनेक दृश्य दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांना अतिशय वाईट वाटले आहे. यातून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,” अशी तक्रार शिवार फाउंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी आपल्या पत्राद्वारे केली गेली आहे. हे पात्र त्यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना पाठवले आहे आणि लवकरच प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा वर्तवली आहे.

या तक्रार पत्रामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, “चित्रपट निर्माता व अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, एवढचं काय तर या पुढे असं चित्रीकरण जर करण्यात आलं तर ते आधीच थांबवलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही,’ अश्या आशयाचा मजकूर यामध्ये आहे. चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी सुभाष साळवे यांनी पात्रातून गृहमंत्र्यांकडे केली आहे.