Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री अमृता अरोराचा अनोखा मास्क; सोशल मीडियावर फोटो झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल एक एक असे ट्रेंड येतायत कि काय सांगायचं..? यामुळे सोशल मीडियावर कधी, कुठे आणि काय वायरल होईल याचा अंदाज लावणं फारच बाई कठीण. आता काय तर अभिनेत्री अमृता अरोराचा विमानातला एक फोटो जोरदार वायरल होत आहे. या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा रंगली आहे कि बस्स. आता तुम्ही म्हणाल असं काय आहे या फोटोत कि हा फोटो इतका चर्चेत आहे. तर याच उत्तर असं कि मास्क. होय. अभिनेत्री अमृता अरोराच्या या फोटोत तुम्ही पाहू शकाल कि तिने मास्क लावलेला नाही तर टी शर्टच मास्क म्हणून तोंडावर ओढलं आहे. आता काय बोलायचं हिला?

सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाला आहे आणि अमृताच्या या उटपटांग गोष्टीमुळे तर या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे. या फोट तुम्ही पाहू शकता कि अमृता विमानात बसली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर तिने नाकापर्यंत टी-शर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा फोटो पाहून अनेकजण म्हणतायत कि, अरे हा तर निराळा मास्क आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सगळेजण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच का काय? पण हा फोटो नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. पण हा फोटो आताचा नसून काही वर्षांपूर्वीचा असेल असाही अंदाज अनेकजण लावत आहेत.

अभिनेत्री अमृता अरोराचा हीने आवारा पागल दीवाना, एक और एक ग्यारह या आणि अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमधून अमृताला अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. मात्र अजय देवगणच्या जमीर या चित्रपटात तिने ‘दिल्ली की सर्दी’ हे आयटम सॉन्ग केले आणि अचानक ती चर्चेत आली. या गाण्यातील अमृता अरोराचा बोल्ड अवतार पाहून भल्या भल्यांना चांगलाच घाम फुटला आणि अनेकांनी तोंडात बोट घातली होती. शिवाय याच गाण्याने अमृताला एक नवी ओळख दिली होती.