Take a fresh look at your lifestyle.

Dilip Kumar Demise अलविदा साहब- सायंकाळी देणार अखेरचा निरोप; अधिकृत ट्विटरवर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहमद युसूफ खान यांचे आज पहाटे निधन झाले. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना मुंबई खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांवर उपचार चालू होते. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. शक्य तितके सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही दिलीप कुमार यांचा जीवनप्रवास अखेर आज थांबला आणि बॉलिवूडमधील एक पर्व कायमस्वरूपी संपले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सकाळी त्यांच्या निधनाची बातमी देणारे एक ट्विट करण्यात आले होते. हे ट्विट दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय मित्र आणि सहाय्यक फैसल फारुकी यांनी केले होते. वत्यांनी या ट्विटमध्ये लिहिले होते, कि मनापासून आणि गहन व्यथा घेऊन मी काही मिनिटांपूर्वी आमचे लाडके दिलीप साब यांचे निधन झाल्याची घोषणा करतो. आपण देवाकडून आलो आहोत आणि ते त्याच्याकडेच परत गेले आहेत. – फैसल फारुकी

 

यानंतर काही वेळापूर्वी दुसरे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट मध्ये दिलीप कुमार यांच्यावर करावयाच्या अंत्यविधीच्या वेळेची आणि स्थानाची माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, आज सायंकाळी ०५.०० वाजता अंत्यसंस्कार. सांताक्रूझ मुंबई येथील जुहू कब्रस्तान. दिलीप कुमार यांचे निधन हि अत्यंत धक्कादायक बाब आहेच. शिवाय बॉलिवूड जगताचे मोठे नुकसान आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिलीप कुमार यांना १९९४ सालामध्ये दादासाहेब फाळके या उच्च व मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ सालामध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इप्तियाझ’ या पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय त्यांना २०१५ सालामध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यासह २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. आज दिलीप कुमार आपल्यात भले नसतील मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले चित्रपटसृष्टीतील काम नेहमीच त्यांना आपल्यात जिवंत ठेवेल. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर सध्या शोककळा पसरली आहे. अनेको कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.