Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिकची लगीनघाई; प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 4, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rang Maza Vegla
0
SHARES
66
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ सध्या अत्यंत महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ही मालिका बरेच दिवस टीआरपीच्या शर्यतीत नंबर वन आहे. या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे. गेल्या तीन वर्षात या मालिकेने अलीकडेच ९०० भाग पूर्ण केले आहेत. कार्तिक आणि दीपाच्या बिघडलेल्या नात्यात पुन्हा प्रेमाचा अंकुर फुटला आहे. वर्षानुवर्षे एकमेकांपासून दूर झालेले कार्तिक आणि दीपा आता पुन्हा एकत्र येत आहेत. या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आलाय. येत्या भागात दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा एकमेकांच्या आयुष्याचा भाग होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

गेल्या काही भागांमध्ये आपण कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात आलेले गैर समाजाचे वादळ पाहिले. यातून निर्माण झालेल्या दुराव्यामुळे दीपा आणि कार्तिकने आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे क्षण गमावले आहेत. इतकेच काय तर त्याच्या जुळ्या मुली कार्तिकी आणि दीपिका या दोघींच्या जन्माचा आनंदही त्या साजरा करू शकल्या नाहीत. या दोन्ही लेकी दोन वेगळ्या घरांमध्ये मोठ्या झाल्या. एकीने आईशिवाय तर दुसरीने बाबांशिवाय आपलं लहानपण काढलं. पण आता हा त्रास, दुःख सगळं काही दूर होऊन गैरसमजाचं मळभही सरलं आहे. आता येत्या भागांमध्ये दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे इनामदार कुटुंबात दीपा- कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिकेतल्या या महत्त्वाच्या आणि आनंदमयी वळणाविषयी सांगताना कार्तिकचे पात्र साकारणारा अभिनेता आशुतोष कुलकर्णी म्हणाला कि, ‘कार्तिकला सत्याचा उलगडा झालाय. त्यामुळे त्याने दीपाची सर्वांसमक्ष माफी मागून दोन्ही मुलींचा पिता म्हणून स्वीकार केलाय. पहिल्यांदा सर्वांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाशी लग्न केलं होतं. यावेळी मात्र सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने हे लग्न पार पडणार आहे. खास बात म्हणजे दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच आमचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मालिकेवर भरभरुन प्रेम करत आहे.’

Tags: Instagram Postmarathi serialPromo VideoRang Maza Veglastar pravah
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group