Take a fresh look at your lifestyle.

लविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपूर्वी लविना लोध हीने प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले होते.महेश भट्टने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. त्यांनी अनेक कलाकार, दिग्दर्शक, कंपोजर्स यांच्याकडून काम काढून घेतली आहेत. ते एक फोन करतात आणि समोरच्याचं काम काढून घेतात. विशेष म्हणजे हे कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. अशा प्रकारे त्यांनी अनेकांचं आयुष्य़ बर्बाद केलं आहे. असा आरोप तिने केला होता. आता महेश भट्ट यांनी हे आरोप फटाळले असून लविना विरोधात मानहानीचा दावा केला आहे.

लविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. भट्ट कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लविना त्यांच्या फ्लॅटवर हक्क बजावत आहे आणि तो फ्लॅट खाली करण्यासाठी कारवाई केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले आहे. महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी नुकताच निवदेन काढलं आहे. त्यामध्ये लविना आणि तिचा पती सुमित सबरवाल यांच्यामध्ये २०१६मध्ये वैवाहिक वाद सुरु होते. सुमित आमच्या विशेष फिल्म कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने हक्क दाखवलेला हा प्लॅट खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्रीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

भट्ट कुटुंबीयांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच तिच्या विरोधात मानहानीची दावा देखील करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’