Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटाला क्रांतीकारी म्हणणंच आश्चर्यकारक; ‘झुंड’विषयी नागराज मंजुळेंचे अनोखे मत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या ४ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी एक स्पेशल स्क्रीनिंग देखील झालं होत. ज्याला सिने इंडस्ट्रीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त झुंड चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांच्या अभिनयातील सजगता लोकांना भावताना दिसतेय. यानंतर प्रत्येकाने झुंड या चित्रपटाचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. कितीतरी लोकांनी हा चित्रपट अतिशय क्रांतिकारी आणि भावनिक करणारा आहे असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी मात्र एक अनोखे मत प्रकट केले आहे.

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांच्या आयुष्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. हि एक सत्य घटना असून ती रुपेरी पडद्यावर आणण्याचे काम नागराज मंजुळे यांनी केले आहे. दरम्यान चित्रपटाविषयीचे आपले मत मांडताना आणि माध्यमांशी बोलताना नागराज म्हणाले कि, ‘लोकांना हा चित्रपट आवडतेय, याचा आनंद आहे. फेसबुकवर लोक स्वत:हून प्रतिक्रिया देत आहेत. न्यूयॉर्क, लंडन, युएईमधून बऱ्याच मित्रांचे, भारतीय लोकांचे मेसेज येत आहेत की त्यांना चित्रपट आवडतोय. पण मला काळात नाही कि, एका सर्वसामान्य माणसाची गोष्ट क्रांतीकारी कशी असू शकते. ‘झुंड’चं कथानक आणि झुंडसारखा चित्रपट म्हणजे क्रांती असल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर मांडलं होतं. त्यावर मलाच हा प्रश्न पडला आहे.

नागराज पुढे म्हणाले, ‘आपण असं याला क्रांतीकारी म्हणतो, याचं मला आश्चर्य वाटतंय. ही साध्या माणसाची गोष्ट आहे. भारतातल्या ९० टक्के लोकांची गोष्टी आहे. ते क्रांतीकारी कसं असू शकतं, हे मला कळत नाही. खूप मोठ्या लोकांचं काहीतरी म्हणणं याच्यात आहे, त्यांचं जगणं याच्यात आहे. ते पडद्यावर येत नाही म्हणून मी प्रयत्न करतो की त्याबद्दल बोलता यावं. ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत, ते पाहून मला वाटतंय की ते यशस्वी होतंय. मला वाटतं की त्यांना अशा फिल्म्स बघायच्या आहेत. आपण समाज म्हणून, माणूस म्हणून, आजूबाजूचं पाहून पुढे पाऊल टाकलं पाहिजे, त्या दृष्टीने मला वाटतं ते महत्त्वाचं आहे.”