Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब ठेवलं ; दिग्दर्शकानी केला खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | खिलाडी अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटकर्यांनी केला होता. त्यातच या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला अशी टीका केली जात आहे. याच दरम्यान चित्रपटाचा दिग्दर्शक राघव लॉरेंस याने चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ का ठेवण्यात आलं? याचं कारण सांगितलं आहे.

तो म्हणाला, “तमिळ चित्रपटात एका व्यक्तिरेखेचं नाव कंचना होतं. त्यावरुनच चित्रपटाचं नाव देखील कंचना असंच ठेवण्यात आलं. तमिळ भाषेत कंचना या शब्दाचा अर्थ सोनं असा होतो. अर्थान कंचना हे देवी लक्ष्मीचं एक रुप आहे असं आम्ही मानतो. परंतु हा संदर्भ कदाचित हिंदी भाषिकांना कळणार नाही त्यामुळे आम्ही चित्रपटाचं नाव लक्ष्मी बॉम्ब असं ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या प्रमाणे आपण लक्ष्मी बॉम्बचा धमाका विसरु शकत नाही तसाच धमाका या चित्रपटाने देखील करावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटातून आम्ही हिंदू देवतांचा अपमान केलेला नाही.”

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.