Take a fresh look at your lifestyle.

राम गोपाल वर्माचं वादग्रस्त विधान; चक्क दाऊद इब्राहिमचे मानले आभार

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारे दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत चक्क कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे आभार मानले आहेत. स्पॉटबॉयला/दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोस्ट वॉटेंड आतंकवादी दाऊद इब्राहिमचे आभार राम गोपाल वर्मा यांनी मानले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गैंगस्टर सारख्या चित्रपटांसाठी मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे.

आता राम गोपाल वर्मा यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ही मुलाखत आगामी ‘डी कंपनी’ या चित्रपटासाठी दिली आहे. ते सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

दरम्यान, रामगोपाल वर्मा यांना जेव्हा विचारले गेले की, डी कंपनीची स्टोरी किती खरी आहे? तर तो म्हणाला, ‘मी डी कंपनीची स्टोरी इनसाइडर्सच्या माहितीवर आधारित बनविली आहे. माझा २००२ चा चित्रपट दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या लढाईवर आधारित होता आणि यावेळीही मी अशीच एक खरी कहाणी घेऊन येत आहे.

राम गोपाल वर्माची डी कंपनी अक्षत कांत नावाचा एक नवीन कलाकार दाऊद इब्राहिमची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की त्यांनी 35 ऑडिशननंतर या कलाकाराची निवड केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.