Take a fresh look at your lifestyle.

दिशा पटानी व आदित्य रॉय कपूरचा १ मिनिटांचा अंडरवॉटर ‘किस’….

चंदेरी दुनिया । दिशा पटानी व आदित्य रॉय कपूरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूडमधील हे दोघे लवकरच मलंग चित्रपटात झळकणार आहेत. नुकतेच त्यांनी या चित्रपटासाठी अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्स शूट केला जो जवळपास 1 मिनिटांचा होता. या चित्रपटात प्रेक्षकांना त्या दोघांचा रोमँटिक अंदाज अनुभवायला मिळणार आहे.


अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्ससाठी दिग्दर्शक मोहित सूरीने शूटिंगच्या आधी दोघांना प्रीपरेशनसाठी वेळ दिला होता. या सीक्वेन्समध्ये कमीत कमी एक मिनिटांसाठी पाण्याखाली राहण्याची गरज होती. श्वास रोखून पाण्याखाली राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. या सीक्वेन्सचं शूटिंग एक दिवस गोव्यात करण्यात आलं. हे शूट कठीण होतं कारण आदित्य व दिशाचा श्वास घेण्याच्या पॅटर्नमध्ये ताळमेळ बसण्याची गरज होती.


मलंग चित्रपटात सूडाच्या भावनेवर आधारीत असलेला ड्रामा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिकी 2चे दिग्दर्शक मोहित सूरीने केले आहे. तर भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिशा व आदित्य व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर व कुणाल खेमू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 14 फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: