हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे ती अनेकदा आपल्या चाहत्यांसह विविध लूकमधील फोटो शेअर करताना दिसते. तिचे हॉट, बोल्ड आणि स्टनिंग फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. कोणताही नवा आऊटफिट ती ज्या कॉन्फिडन्सने कॅरी करते ते पाहूनच चाहते तिच्यावर भाळतात. सध्या तिचं असंच एक काळजावर घाला घालणार अतिशय ग्लॅमरस फोटोशूट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये ती अतिशय भन्नाट दिसते आहे. या फोटोशूटमध्ये दिशाने डिझायनर आऊटफिट वेअर केला आहे. ज्याचा रंग पूर्ण क्लासी ब्लॅक आहे. यामध्ये ती कमालीची आकर्षक दिसते आहे. मोकळे केस, परफेक्ट काजल आणि लायनरमूळे तिचा फेसलूक फारच आकर्षक वाटतो आहे. शिवाय तिने कानात सिल्वर बॉक्स टॉप्स परिधान केले आहेत आणि उजव्या हातातील बोटात सिल्वर अंगठी परिधान करीत लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर चांगलीच जादू केली आहे. या फोटोशूटवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करीत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. अनेकांनी रेड हार्ट ईमोजी आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, दिशा को पटानी है…! याशिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, अखेर काहीतरी इंटरेस्टिंग… तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, अमेझिंग लूक. अशाप्रकारे चाहत्यांनी दिशाच्या फोटोशूवर विविध कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Discussion about this post