Take a fresh look at your lifestyle.

भाजप v/s शिवसेना; लता दीदींच्या स्मारकावरून संजय राऊत आणि राम कदम यांच्यात वाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्य संस्कार पार पडले. आज जगभरात ठिकठिकाणी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दरम्यान लता दीदींचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको असे स्पष्टपणे सांगितले.

भारतरत्न दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्कवर उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केल्यानंतर माध्यमांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आपली प्रतिक्रिया देण्यास आग्रह केला. दरम्यान याबाबत संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता लता दीदींच्या आठवणीना उजाळा देणारे स्मारक केंद्र राज्य सरकार नक्कीच उभारेल मात्र त्यावरून कोणी राजकारण करू नये असे सांगितले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर याची नक्कीच नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करेल. पण लक्षात ठेवा लता दिदी या काही राजकारणी नव्हत्या. ते असं व्यक्तीमत्व होतं की, त्याचं स्मारक करणं सोप नाही. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की, त्यांच्या स्मारकाबद्दल देशालाही विचार करावा लागेल. लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा राष्ट्रीय स्तरावर विचार केला जावा असे संकेत संजय राऊत यांनी बोलताना दिले.