Take a fresh look at your lifestyle.

मांजरेकरांच्या आगामी चित्रपटात सत्याच्या नावावर स्त्रियांची अवहेलना?; महिला आयोगाने मागितले स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्री गाजवणारे दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी नेहमीच आपल्या चाहत्यांना आगळ्या वेगळ्या कथानकाचे सिनेमे दिले आहेत. त्यामुळे मांजरेकरांचा चित्रपट येणार म्हटलं कि चाहते एकदम खुश. आपल्या वेगवेगळ्या कथेवर आणि दिग्दर्शन कलेवर जोर देत महेश मांजरेकर यांनी नेहमीच एक उत्तम सादरीकरण केले आहे. आपल्या कथानकांमध्ये वैविध्य राखीत मांजरेकर यांनी आजवर अनेक कलाकृती सादर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NH Marathi (@nh_marathi)

यानंतर आता लवकरच ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं काहीस वेगळंच शीर्षक असलेला हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर लोकांनी आक्षेप घेत थेट महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर आयोगाने मांजरेकरांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या सोशल मीडिया ट्विटर हँडलचा वापर करीत मांजरेकरांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला.

यानंतर आणखी एक ट्विट करीत चाकणकर यांनी लिहिले कि, असून हे दृश्य या चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची या निर्मितीमागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविले आहे.

मांजरेकरांच्या चित्रपटाचे एक खास बात म्हणजे ते नेहमीच काहीतरी हटके आणि मातीशी संबंधित देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे यादेखील चित्रपटात काही ज्वलंत विषयांवर भाष्य करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी जेव्हा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला होता. यानंतर मात्र काहींनी चित्रपटातील अनेक दृश्यांवर बोट ठेवून आपला आक्षेप नोंदविला आहे. अखेर आज राज्य महिला आयोगाने मांजरेकरांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत आहे मांजरेकर आपली काय भूमिका दर्शवितात हे महत्वाचे ठरणार आहे.