Take a fresh look at your lifestyle.

माझं लैंगिक शोषण केलं जातंय ; दिव्या भटनागरचे ‘ते’ चॅट्स आले समोर

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |  ‘ये रिश्ता क्या कहलाता ‘है या मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. दिव्याच्या निधनानंतर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने दिव्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देवोलीनानंतर आता अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रानेदेखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आकांक्षाने दिव्यासोबत झालेल्या संभाषणाचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये दिव्याचा पती गगन गबरु दिव्याचं शारीरिक व मानसिक शोषण करत होता असं दिसत आहे.

आकांक्षाने इन्स्टाग्रामवर दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स शेअर केले आहेत. यामध्ये दिव्या तिच्या होणाऱ्या छळाविषयी आकांक्षाला सांगताना दिसत आहे. यामध्ये गगन दररोज दिव्याचं मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तसंच तिला धमकीदेखील देत होता असं या चॅट्सवरुन दिसून येत आहे.

दिव्याऐवजी तो एक सुंदर आणि सडपातळ महिला घरकाम करण्यासाठी आणेल, ज्यामुळे त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, अशी धमकी गगन सतत दिव्याला द्यायचा. त्यासोबतच गगने काही वेळा दिव्यावर हात उचलला असून तिला पट्ट्याने मारल्याचंदेखील दिव्याने म्हटल्याचं या चॅटमध्ये दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.