Take a fresh look at your lifestyle.

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल डॉक्टरांनी केला पोलिसांकडे सुपूर्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १३’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन अत्यंत धक्कादायक बातमी असून त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या चाहत्यांना हा धक्का अद्यापही सहन झालेला नाही. काल (२ सप्टेंबर २०२१) हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. दरम्यान सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. यानंतर सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा (पोस्ट मार्टम रिपोर्ट) अहवाल काय सांगतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले असताना आता डॉक्टरांनी हा अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मुंबई पोलिसांकडून सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु बायोप्सीनंतर मृत्यूचे मूळ कारण सांगण्यात येईल. सिद्धार्थच्या शवविच्छेदन अहवालवरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे. लवकरच याविषयीची अधिक माहिती मिळेल अशी आशा आहे.

सूत्रानुसार, आज दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मकुमारी जुहू कार्यालयात येथे नेण्यात येईल आणि तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील त्याच्या घरी आणले जाईल. यासाठी सिद्धार्थच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थची अचानक झालेली एक्झिट त्याच्या चाहत्यांसाठी असहनीय आहे. परंतु आपल्या लाडक्या सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल चाहत्यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली आहे.

माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. यानंतर तो सकाळी उठलाचा नाही. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, परवाच्या रात्री सिद्धार्थ ज्या गाडीने त्याच्या फ्लॅटवर गेलेला त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली आहे. गाडीची अवस्था पाहून अनेक संदर्भ लावले जात आहेत. सिद्धार्थचे कोणाशी भांडण झाले असेल? का आणखी काही ज्यामुळे कारची काच तुटली? तर पोलीस सूत्रांनुसार, सिद्धार्थच्या कुटुंबियांनी कोणतीही शंका व्यक्त केलेली नाही. डॉ. निरंजन यांनी सिद्धार्थच्या शरीराची तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले होते. त्यामुळे सध्या सिद्धार्थचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.