हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात एक मोठा वाद निर्माण होण्याची भीती दिसून येत आहे. कारण या वादाचे कारण आहे, डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणे. होय. व्हाय आय किल्ड गांधी हा आगामी चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजीओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे. यावरून राज्यभरातून विविध पडसाद उमटताना दिसून येत आहेत. नुकतेच याबाबत ट्विट करून जितेंद्र आव्हान यांनी अमोल कोल्हेंवर रोष व्यक्त केला आहे. आव्हाडांनी कोल्हेंच्या भूमिकेवर प्रश्न उठवीत कलाकाराचा वेष पांघरून गांधी हत्येला समर्थन करू शकत नाही असे म्हटले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022
आतापर्यंत डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारणे याला अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत भाष्य करताना नेते जितेंद्र आव्हाढ यांनी ट्विटदेखील केले आहे. तर माध्यमांशी देखील संवाद साधला आहे. दरम्यान ते म्हणाले की, ‘राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही.’ तर ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले कि, डॉ.अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.
https://www.youtube.com/watch?v=ygfbYwAr0AU
याबाबत बोलताना अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे यांनी माध्यमांना सांगितले कि, ‘कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळते, परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही, तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावे ही अपेक्षा!’
Discussion about this post