Take a fresh look at your lifestyle.

दीपिका- सिद्धांतच्या ‘गहराइया’तील डूबे’ची प्रेक्षकांना चढली झिंग; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि नवा कुल हँडसम फेस सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गहराइया’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवला आहे. अमेझॉन ओरिजिनल ‘गहराइया’चा साउंडट्रॅक हा या वर्षातील सर्वात प्रतिक्षित अल्बमपैकी एक ओळखला जात आहे. त्याच्या टीझरमध्ये असलेला टायटल ट्रॅक आधीच सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. यानंतर आता ‘डूबे’ने तर प्रेक्षकांच्या मनावर आणि मेंदूवरच ताबा मिळवला आहे असे वाटू लागले आहे. या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमधून ‘डूबे’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यापासून चांगलेच ट्रेंड होत आहे.

अंकुर तिवारी यांच्या द्वारे निर्मिती केलेले ‘डुबे’ हे गाणे कबीर कथपालिया उर्फ ​​ओएएफएफ आणि सवेरा यांनी स्वरबद्ध केले आहे. तर या गाण्याला कौसर मुनीर यांनी शब्दबद्ध केले आहे आणि लोथिका झा यांनी त्यास आपला सुरेल आवाज देत हे गाणे गायले आहे. ‘गहराइया’ या चित्रपटातील ‘डुबे’ या पहिल्या गाण्याबद्दल अंकुर याने सांगितलं की, “’गहराइया’चे संगीत त्याच्या कथेसाठी योग्य असावे असे मला सुरुवातीपासूनच वाटत होते. जे प्रेक्षकांना या पात्रांच्या जगात घेऊन जाण्यास मदत करेल. कबीर, सवेरा आणि आमचे गीतकार कौसर या सर्वांनी तरुणपणाचे सार जमवून आणण्याचे अभूतपूर्व काम केले आहे. तसेच लोथिकाचा आवाज या गाण्यामध्ये योग्य प्रमाणात ताजेपणा आणि तीव्रता जोडतो.”

‘गहराइया’ हा चित्रपट तरुणाईचे लक्ष पूर्णपणे वेधून घेणारा असा चित्रपट ठरणार आहे. शिवाय यात लाखो दिलों कि धडकन दीपिका पदुकोण आणि तरुणीच्या दिलाचा उफ्फ किंग सिद्धांत चतुर्वेदी यासह बोल्ड आणि ब्युटीफुल अनन्या पांडे हे तिघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच धैर्य कारवा, नसीरुद्दीन शहा आणि रजत कपूर या काळकरांच्यादेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. धर्मा प्रोडक्शन्स, व्हायकॉम 18 आणि शकुन बत्राची जोउस्का फिल्म्स यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट फक्त अमेझॉन प्राइम व्हिडियोवर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.