Take a fresh look at your lifestyle.

‘झुंड’च्या ट्रेलरमधील आंबेडकरांचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरू अर्थात प्रेक्षकांची लाडकी आर्ची आणि आकाश ठोसर अर्थात प्रेक्षकांचा लाडका परश्या हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांना पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातील एका दृश्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतोय आणि हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

येत्या ४ मार्च २०२२ रोजी झुंड हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. शिवाय चित्रपटाच्या ट्रेलरमुळे हा चित्रपट बहुचर्चित ठरला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक फ्रेम पहायला मिळतेय. या दृश्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. तर काहींनी याचा स्क्रिनशॉट फोटो व्हायरल केला आहे. तसेच अनेकांनी ह्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या.

एका नेटकऱ्याने या व्हायरल फोटोवर कमेंट करताना लिहिले कि, ‘१०० वर्षाच्या बॉलिवूड चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चित्रपटात पहायला मिळाला. तर अन्य एका नेटकाऱ्याने लिहिले कि, मुस्लिम शासित बॉलीवूड दलितांशी पक्षपाती आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? मला वाटते की हा फोटो पाहिल्यावर तुम्ही असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाही. शिवाय अनेकांनी यावर जय भीम अश्याही कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांचा, ‘एका दगडात ही पोरं जनावर मारतात. जर यांच्या हातात बॉल दिला तर ते जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होतील’ हा डायलॉग देखील लोकांना प्रचंड भावला आहे.