Take a fresh look at your lifestyle.

डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा यांनी दिली प्रेमाची कबुली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा हि दोन्ही नावे कॉमेडी जगतात गाजलेली नावे आहेत. यांनी कॉमेडीच्या विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. कॉमेडी करता करता या दोघांची गाडी कधी प्रेमाच्या पटरीवर उतरली हेच कळलं नाही. नुकतेच या दोघांनी त्यांच्या या गोड नात्याची कबुली दिली आहे. एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करीत त्यांनी आपल्या नात्याविषयीचे संकेत दिले आहेत.

नुकताच संकेतने सुगंधासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. सोबत माझी सनशाईन मला मिळाली असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. संकेतच्या या पोस्टवर अगदी काही तासांतच ५२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. संकेतच्या या पोस्टवर पारितोष त्रिपाठी, नकुल मेहता, राहुल देव यांसारख्या सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर सुंगंधाने शेअर केलेल्या फोटोसोबत तिने २६-४-२०२१ आणि काउंट डाऊन बिगिन्स असे कॅप्शन दिले आहे. यावरून येत्या २६ तारखेला दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. संकेत आणि सुगंधा यांची जोडी सगळ्यात बेस्ट जोडी असल्याचे त्यांचे फॅन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.

अभिनेत्री सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री ती अगदी हुबेहूब करते. या सुंदर मिमिक्री शैलीसाठी तिला खुद्द लतादीदींकडून दाद मिळाली आहे. ती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये देखील झळकली आहे. तर डान्स प्लस या डान्सिंग रिऍलिटी शो मध्ये तिने सुरसुरी हे पात्र भूषवित मनामनांवर राज्य केले आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.