हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड कॉंट्रोव्हर्सी क्वीन अभिनेत्री राखी सावंत कधी काय करेल आणि कुठे काय करून दाखवेल याचा अंदाज लावणे खरच कठीण आहे. कधी या तर कधी त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या राखीचे नवेकोरे गाणे ड्रिम में मेरी एंट्री सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. या दरम्यान राखी प्रमोशन च्या नावावर काय काय फंडे करतेय काय सांगू? तिने तर भर रस्त्यात शाळाच भरवली आहे. रिक्षावाल्या काकांना डान्स स्टेप शिकवत चक्क तिने त्यांना नाचवलं आहे. होय. राखीचा मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा वाल्या काकांसोबतचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
अलीकडेच राखीचा ‘ड्रिम में मेरी एंट्री’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. या गाण्यात राखी सावंत अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसते आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत लाखो व्युज याला मिळाले आहेत. यात राखीने दमदार डान्स केला आहे. हे गाणे युट्यूबवर चांगलेच वायरल होत आहे. शिवाय हे गाणे १८व्या स्थानावर ट्रेंड करत आहे.
दरम्यान याच गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी राखी सावंत अलग अलग फंडे शोधून काढत आहे. ती नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून कायतरी कला करताना दिसतेय. यावेळी तर काय स्वतः लोकांना डान्सच्या स्टेप शिकवून शिकवून ती नाचवू लागली आहे आणि रिक्षावाले काका सुद्धा तिच्यासोबत चांगलेच थिरकत आहेत. हा व्हिडीओ सध्या भन्नाट वायरल होतोय.
गेल्या काही दिवसांपासून राखीचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वजन वाढल्याने ते घटवण्यासाठी राखी फिटनेस सेंटरमध्ये घाम गाळून गाळून अतोनात कष्ट घेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी योगा करतानाचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या व्हिडिओमुळे तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. पण ऐकेल आणि थांबेल ती राखी कुठली. यानंतरहि तिचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतच आहेत.