Take a fresh look at your lifestyle.

करिनाच्या प्रेग्नेंसी बुकवर आक्षेपाचे ग्रहण; मायनॉरिटी बोर्डकडून कायदेशीर कारवाईची शक्यता

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री करीना कपूर खानने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आणखी एका नवाबाला जन्म दिला आहे. अशी दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर बेबोने स्वतःच्या गरोदरपणावर लिहिलेलं पुस्तक स्वतःच प्रकाशित केलं. याबाबतची माहिती खुद्द करिनानेच सोशल मीडियावर शेअर केली होती. हे पुस्तक म्हणजे माझं तिसरं मुलं असेही करीनाने म्हटले होते. पण आता याच पुस्तकामुळे ती चांगलीच अडचणीत आली आहे. तिचं हे प्रेग्नेंसी पुस्तक एका वादाचे कारण ठरले आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्ड हे याप्रकरणी करिनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

करिना कपूरने तिच्या दोन्ही प्रेग्नंसी काळातील अनुभवांच्या आधारावर ‘Kareena Kapoor Khan’s Pregnancy Bible’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या नावावरून आता चांगलाच वाद उफाळला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डाने पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मायनॉरिटी बोर्डचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये एका बैठकीच आयोजन केले होते. या बैठकीत करीनाच्या पुस्तकाचा विरोध करण्यात आला. पुस्तकाचे नाव ‘प्रेग्नंसी बायबल’ ठेवल्याबद्दल करिनाची कडक शब्दांत निंदा करण्यात आली. खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, मायनॉरिटी बोर्ड याप्रकरणी करीना विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे करीना विरोधात लवकरच गुन्हा दाखल होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

करीना कपूर खान हिने तिच्या या पुस्तकात तिची गर्भावस्थेतील शारिरीक व मानसिक अनुभव मांडले आहेत. दोन्ही वेळेला करीनाचे मोठ्या प्राणावर वजन वाढले होते. त्याबाबतही तिने या पुस्तकात अनुभव मांडला आहे. काही महिन्यांपूर्वी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यावेळी करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या झलकसाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर आता या बाळाचे नामकरणही झाले आहे. त्याचे नाव जेह ठेवण्यात आले असून याबाबतची माहिती त्याचे आजोबा रणधीर कपूर यांनी दिली होतो.