Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमला ED चे दुसरे समन्स; दुर्लक्ष केल्यास होणार अटक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फेअर अँड लव्हली गर्ल अर्थात बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम चांगलीच अडचणीत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून यामी तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. लग्नादरम्यान ती मुंबईबाहेर होती. मात्र आता लग्न झाल्यानंतर ती मुंबईत परतली आहे आणि ती मुंबईत येताच सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) तिला मोठा दणका दिला आहे. ईडीने यामीला समन्स जारी केले आहे. विशेष म्हणजे, यामीला ईडीने जारी केलेले हे दुसरे समन्स आहे. त्यानुसार, यामीला येत्या ७ जुलैला ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणे बंधनकारक आहे.

परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत यामीविरुद्ध हे दुसरे समन्स बजावण्यात आले आहे. या अंतर्गत यामिनी कसून चौकशी केली जाणार आहे. तूर्तास यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा दाट संशय ईडीला आहे. यामीच्या बँक खात्यातून परकीय चलनाची देवाणघेवाण केली असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. याबद्दल अद्याप कुठलीही इतरत्र माहिती जारी करण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणी अभिनेत्री यामी गौतम विरोधात हे दुसरे समन्स जारी करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटक केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री यामी गौतम हि बॉलिवूड जगतातील आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या अनेक विविध चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. यात उरी, काबील, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विकी डोनर, टोटल सियापा, बाला अशा विविध कथानक असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. लवकरच ती अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी’ या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय सैफ अली खान आणि अर्जुन कपूरच्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. यामीने नुकतीच दिग्दर्शक आदित्य धरसोबत साता जन्माची लग्नगाठ बांधली आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. उरी या चित्रपटादरम्यान त्या दोघांनी एकत्र काम केले होते.