Take a fresh look at your lifestyle.

राज कुंद्रानंतर एकता कपूरला अटक होणार?; KRK च्या ट्विटमुळे नेटकरी संभ्रमात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर एकापाठोपाठ एक आणखीच नवे नवे खुलासे आणि प्रकरणं समोर येत आहेत. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी क्राइम ब्रांचने साधारण फेब्रुवारीपासून या प्रकरणाचा तपस सुरु केला होता आणि यानंतर हि अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती आणि प्रसारण या आरोपाखाली राज कुंद्रावर कारवाई केली आहे. ज्यामध्ये शिल्पाचा पती राज कुंद्रा हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनेकांनी अनेको कमेंट्स केल्या असताना स्वयंघोषित समीक्षक कमाल राशिद खान याने ट्विटरवर ट्विट करीत आणखी काही सेलिब्रिटींची नाव घेतली आहेत. यात बालाजी टेलिफिल्म्स च्या एकता कपूरचे नाव घेण्यात आले आहे.

कमाल आर खान अर्थात KRK नेहमीच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. इतकेच काय तर, सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे नेहमीच इतर कलाकारांवर टीका करण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. प्रत्येक विषयावर आपले मत उघडपणे आणि वाट्टेल त्या शब्दात व्यक्त करणे हीच त्याची खासियत आहे. त्यामुळे आता राज कुंद्राच्या अटकेनंतर केआरकेचे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एकता कपूरबद्दल बोलताना म्हणाला आहे कि, राज कुंद्रानंतर आता एकता कपूरला अटक होईल.

यूट्यूबचा व्हिडिओ शेअर करताना कमाल आर खानने ट्विटरवर लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये असे म्हटले गेले आहे कि, # एकता कपूरला अटक केली जाऊ शकते, फार पूर्वी राज कुंद्रा म्हणाले होते, माझ्या नंतर एकताचा नंबर घेतला जाईल, अटक होईल.” कमाल आर खानचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. तर, राज कुंद्राला शुक्रवार पर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. मुळात राज कुंद्राविरोधात पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी नक्कीच संपणाऱ्या नाहीत मात्र एकता कपूरचे काय होणार हा एक प्रश्न KRK ने नव्याने उपस्थित करून ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.