Take a fresh look at your lifestyle.

नारायणीच्या मदतीला धावली एकता; नेमके काय ते जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नारायणी शास्त्री हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे. एकाहून एक सरस भूमिका बजावणारी नारायणी गेल्या कित्येक वर्षांपासून कुठे दिसलीच नाही. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने अलग धाटणीच्या सुंदर भूमिका साकारल्या होत्या. पण गेल्या काही काळापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर नव्हे फार दूर आहे. मात्र नारायणी नुकतीच एका वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा झळकली. त्याचे कारण एकता कपूर आहे.

नारायणीने लग्न केल्यानंतर तिने या क्षेत्रापासून अंतर राखले होते. काही वर्षांपासून ती परदेशात राहात आहे. तिने परदेशाचे नागरिकत्व घेतल्याने ती वर्किंग व्हिसावर भारतात काम करत होती. पण या सगळ्यामुळे निर्मात्यांना तिला अधिक पैसे द्यावे लागत होते. परिणामी पैसे परवडत नसल्याने अनेक जणांनी तिला काम देणे बंद केले.

तिच्या करियरच्या सुरुवातीला तिने एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकेतील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली होती. त्याचमुळे एकता कपूर नारायणीच्या मदतीसाठी धावून आली होती. तिला एकताने तिच्या गंदी बात या वेबसिरिजमध्ये काम करण्याची संधी दिली होती. नारायणी क्योंकी साँस भी कभी बहू थी या बहुचर्चित मालिकेमुळे विशेष ओळखण्यात आली होती. ‘कुसुम’, ‘पिया का घर’, ‘नमक हराम’, ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘फिर सुबह होगी’, ‘लाल इश्क’ अशा अनेक टीव्ही मालिकेतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

नारायणी तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा खाजगी आयुष्यातीळ घडामोडींमुळेच जास्त चर्चेत होती. अभिनेता गौरव चोप्रा आणि नारायणी शास्त्री या दोघांनी ‘पिया का घर’, ‘घर घर की लक्ष्मी’,’बेटीयाँ’ सारख्या मालिकेत काम केले. मालिकेच्या सेटवरच त्यांच्या मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र फार काळ त्यांचे हे नाते टिकले नाही. अनुज सक्सेना सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचा को-स्टार असलेल्या गौरव चोप्रा सोबत तिचे नाव जोडले गेले होते.