Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात इमरान हाश्मी व्हिलनच्या भूमिकेत

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशा नंतर आता अभिनेता सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग मार्च पासून सुरू होणार असल्याचे समजते आहे.दरम्यान, टायगर 3 या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेमध्ये इमरान हाश्मी दिसणार आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले वेळापत्रक मार्च 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत होईल.

इमरान हाश्मी मार्चमध्येच या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता असून तिसरे आणि शेवटचे वेळापत्रक पुन्हा मुंबईत होणार आहे. मध्यंतरी एक बातमी होती की, या चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये होईल, पण आता चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये होणार आहे.

चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्राने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. कारण युएईमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणूनच आदित्य यांनी चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.