Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नारळाच्या बागा, समुद्राचा गाज, हिरवीगर्द झाडी अन गौरवशाली इतिहास’; प्लॅनेट मराठीसोबत करा कोकणची सफर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
colourfull Kokan
0
SHARES
710
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोकण आपल्या अभिजात निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. नारळी पोफळीच्या बागा… समुद्राचा गाज… हिरवीगर्द झाडी… गौरवशाली इतिहास… कोकणाला विशेषण देऊ तितकी कमी. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलेला कोकण म्हणजे स्वर्गच जणू. अशाच निसर्गरम्य कोकणची सफर आपल्याला घडणार आहे मँगो व्हिलेज गुहागर प्रस्तुत ‘कलरफुल कोकण’मधून.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

याचे पहिले दोन भाग १७ मेपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहेत. सहा एपिसोड्सच्या या शोची निर्मिती जगन्नाथ देवदत्त नाडकर्णी आणि स्वप्ना किरण चंदावरकर यांनी केली आहे. कोकणातील पुरातन मंदिरे, अथांग समुद्र, कोकणची लोककला, पारंपरिक खाद्यसंस्कृती, पर्यटन स्थळे एकंदरच कोकणची संस्कृती या ‘कलरफुल कोकण’मध्ये अनुभवायला मिळणार आहे आणि याचे सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” मराठी संस्कृतीमध्येही किती विविधता आहे. अंतरा अंतरावर भाषा बदलते. महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचे काही वैशिष्टय आहे. असेच निसर्गसौंदर्याचे लेणे लेऊन आलेले ठिकाण म्हणजे कोकण. कला, साहित्य व संस्कृतीच्या आविष्कारानंही समृद्ध असे हे कोकण म्हणूनच तर पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. कोकणची साहित्य संपदाही विपुल आहे. आजही कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव, यात्रोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. मुळात इथले लोक उत्सवप्रिय आहेत.कोकणातील हीच वैविध्यतेने नटलेली संस्कृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा यामागचा मुख्य हेतू आहे.”

Tags: Digambar NaikInstagram Postmarathi actorviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group