Take a fresh look at your lifestyle.

एंटरटेनमेंट इस बॅक; ड्रामाक्वीन राखी सावंत करणार Big Boss OTTमध्ये एंट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. त्यात यंदाचा बिग बॉसचा सीजन थोडा नाही जर थोडा जास्तच वेगळा आहे. एकतर बिग बॉसचा हा सीजन टीव्ही आधी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. अहो इतकाच काय तर शो चा तात्पुरता का होईना होस्टसुद्धा बदलला. सलमान खानच्या जागी बिग बॉस ओटीटीसाठी फिल्ममेकर करण जोहर होस्टिंग करताना दिसतोय. या सिजनचे २ आठवडे उलटले आहेत पण प्रेक्षकांचे म्हणावे तसे मनोरंजन काही झाले नाही. या शो चे पहिले एलिमिनेशन आणि पहिला विकेंड वॉरसुद्धा झाला आहे. यासाठी एक्स कन्टेस्टंट शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला उपस्थित होता आणि त्यांनी विकेंड वॉरला रंगत आणली. यानंतर आता विकेंड वॉरमध्ये प्रेक्षकांची लाडकी एन्टरटेनर येणार आहे. ती म्हणजे राखी सावंत.

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’ची जोरदार चर्चा चालू आहे. हा शो सुरू होऊन दोन आठवडे उलटले पण प्रेक्षक अजूनही त्या एन्टरटेन्मेण्टच्या प्रतीक्षेत आहेत, जे अजूनही होत नाही. यासाठी गेल्या आठवड्यात सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गीलने प्रयत्न केला पण एंटरटेनमेंट म्हटलं आणि ड्रामा क्वीन राखी सावंतचे नाव समोर आले नाही. तर काय अर्थ आहे. यानंतर अखेर राखीची आणि तिच्या चाहत्यांची इच्छा बिग बॉस पूर्ण करणार आहे. कारण अखेर राखी या विकेंड वॉरमध्ये एन्टरटेन्मेण्टचा धमाका घेऊन ग्रँड एंट्री करताना दिसणार आहे.

यासंदर्भातील राखीचा हटके अंदाजातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती हटके आणि नेहमीप्रमाणे तिच्या वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिलेले आहे की, ‘जुली असो की राखी आता पाहणं बाकी आहे. एन्टरटेन्मेंट क्वीन येत आहे संडे का वॉरमध्ये.’ त्यामुळे राखी मनोरंजन करणार का घाबरवणार का घाबरवत घाबरवत मनोरंजन करणार हे पाहणे बाकी आहे. दरम्यान ‘बिग बॉस १४’ मध्ये राखी दिसली होती. तेव्हा शोचा होस्ट सलमान खानने तिला बेस्ट एन्टरटेनर म्हटलं होतं. त्यामुळे बिग बॉस ओटीटीसाठी राखी द एन्टरटेनरची गरज आहे असे अनेकांना वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.