Take a fresh look at your lifestyle.

चित्रीकरण बंद असले तरीही प्रेक्षक पाहू शकणार झी मराठीवरील मालिकांचे आगामी भाग

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे परिस्थिती आटोक्यात आणता यावी म्हणून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परिणामी मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांचे पुढील भाग पाहता येतील का नाही ? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. तर आता काळजी करण्याची गरजच नाही. कारण झी मराठीवरील मालिकांचे नवे भाग सुरू राहणार आहेत.

पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित असणारी मालिका ‘घेतला वसा टाकू नको’ याचे आजपासून ‘रामनवमी’ विशेष भाग प्रक्षेपित होणार आहेत. विशेष म्हणजे या भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माआधीपासून ते श्रीराम जन्मापर्यंतची कहाणी दाखवण्यात येणार आहे. तर मनू आणि अनिकेतच्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येणार असून पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘माझा होशील ना’ ही मालिका तर अनोख्या वळणावर आहे. मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवी आव्हाने येऊन उभी ठाकणार आहेत. गुलप्रीत बंधू मामाची बायको आहे, हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे. तसेच दादामामाची बायको सिंधूने घराचा ताबा घेतला आहे. तिकडे जे.डी. चा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीवर डोळा आहे. या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमध्ये मोमोसोबत ओमचा साखरपुडा होणार की शकू मावशी रॉकीच्या मदतीने स्वीटू आणि ओमला एकत्र आणणार? हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे. तर ‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेत सोहमचे खरे रूप आसावरी समोर येईल का? अभिजीतने शुभ्राला दिलेली जबाबदारी ती पेलवू शकेल का? कि येणार नवे वादळ? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहे.

तर रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतील अभिराम वाडा विकायला तयार होईल का? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता विरोधात जाईल का? सयाजीच्या वागणुकीमुळे अभिराम आणि कावेरीच्या नात्यात कटुता येईल का? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना अगदी रंजक रूपात मिळणार आहेत.