Take a fresh look at your lifestyle.

आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक स्टार; हृतिक-कॅटरिना स्टारर जाहिरातीवर टिका करणाऱ्यांना ‘झोमॅटो’ने दिले प्रत्युत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झोमॅटो’ हि एक अशी कंपनी आहे जिने फार कमी काळात फूड इंडस्ट्रीमध्ये आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे सध्या फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनींपैकी झोमॅटो हि कंपनी एक मानली जाते. प्रत्येक जण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवे नवे फंडे वापरत असतात. त्यामुळे अलीकडेच झोमॅटोची एक नवी जाहिरात फुडीजसमोर आली आहे. हि जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे. पण झालाय असं कि ह्या जाहिरातीमुळे मार्केटिंग वेगळ्याच दिशेला जात आहे.

त्याचे झाले असे कि, नुकतेच झोमॅटोने आपल्या दोन नव्या जाहिराती रिलीज केल्या. या जाहिरातींमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हे दोघे दिसत आहे. अर्थात यांच्यावर या जाहिराती चित्रीत करण्यात आल्या आहेत. मात्र हेच ते कारण ज्यामुळे झोमॅटोची मार्केटिंग उलट प्रवाहाकडे वळली. या जाहिरातींवर सध्या जबरदस्त टीका होत आहे. एकीकडे मोठमोठ्या बॉलिवूड स्टार्सला जाहिरातीसाठी साईन करून झोमॅटो प्रसिद्धीवर पाण्यासारखा पैसा खर्च करते आणि दुसरीकडे डिलिव्हरी बॉईजचे शोषण करते, अशा प्रकारची टीका या जाहिरातींमुळे झोमॅटो कंपनी वर होत आहेत. यानंतर आता झोमॅटोने या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

हे स्पष्टीकरण देताना झोमॅटो कंपनीकडून सांगण्यात आले कि, आमच्या जाहिराती योग्य संदेश देत आहेत. हा आमचा विश्वास आहे. पण काहींनी या जाहिरातींचा चुकीचा अर्थ काढला आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे आम्ही या जाहिरातींमागचा आमचा दृष्टिकोन काय होता, हे सांगू इच्छितो. सध्या सोशल मीडियावर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजच्या समस्यांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र आमच्या जाहिरातीची संकल्पना ६ महिन्यांपूर्वी मांडली गेली आणि दोन महिन्यांपूर्वी यांचं शूटिंग झालं. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या चर्चेशी जाहिरातींचा काहीही संबंध नाही.

तसेच या जाहिरातून, डिलिव्हरी पार्टनर्सला हिरो बनवणं आणि आमच्यासाठी प्रत्येक ग्राहकच स्टार असल्याचेच आम्हाला दाखवायचे होते.

कारण, या जाहिरातीत हृतिक आणि कॅटरिना डिलिव्हरी पार्टनरसोबत जसे आदराने वागतात, तसेच सर्वांनी वागण्याची गरज आहे. या गोष्टीकडे आम्हाला लक्ष वेधायचे होते. परंतु काही मोजके ग्राहकच प्रत्यक्षात तसे वागतात.

शिवाय डिलिव्हरी पार्टनरच्या कामाला असलेली प्रतिष्ठा दर्शवणं आणि वाढवणं, तसंच आमचे डिलिव्हरी पार्टनर्स किती अभिमानाने आपलं काम करतात हे दर्शवणं, असे मुख्य उद्देश या जाहिरातीमागे होते असे झोमॅटो कंपनीने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त, डिलिव्हरी पार्टनर्ससंदर्भातील समस्या व त्यांचे मुद्दे योग्य रीतीने सोडवण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असंही झोमॅटोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.