Take a fresh look at your lifestyle.

‘प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते’; राज कुंद्रा प्रकरणावर कंगनाची सडकून टीका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि अत्यंत मोठा प्रसिद्ध उद्योजक असणारा राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट तयार करणे आणि ऍपच्या माध्यमातून प्रदर्शित करणे या आरोपाखाली अटक झाल्यानंतर सिनेइंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत जो तो आपल्या प्रतिक्रिया विविध पद्धतीने देताना दिसत आहे. यानंतर आता या प्रकरणाबाबत बॉलिवूड अभिनेत्री आणि रोखठोक व्यक्तिमत्व असणारी कंगना रनौत हिने आपले मत व्यक्त केले आहे. मुळात इंडस्ट्री असो किंवा देश.. काही घडलं आणि कंगना बोलणार नाही, हे जणू अशक्यच आहे. त्यामुळे राजला अटक होताच कंगनाने इंडस्ट्रीला गटार म्हणत प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनें नसतं अशी टीका केली आहे.

राज कुंद्राला सोमवारी रात्री या प्रकरणी मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला २३ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यानंतर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी समर्थनार्थ तर कुणी विरोधात बोलत आपले मत व्यक्त केले आहे. यातील कंगना रनौतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया देत लिहिले कि, ‘हेच कारण आहे की, मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते.

प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं नसते…. इतकेच नव्हे तर, माझ्या प्रॉडक्शनच्या ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून मी बॉलिवूड इंडस्ट्रीचा पर्दाफाश करणार आहे. या इंडस्ट्रीला सक्षम मूल्यांवर आधारित व्यवस्था हवी आहे. असे म्हणत कंगनाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीबाबत भडास काढली आहे. कंगना नेहमीच तिखट आणि परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आत्तापर्यंत इंडस्ट्रीतील अनेको दिग्गजांची तिने ऐशी कि तैशी केली आहे. यानंतर बहुतेक आता तिच्या निशाण्यावर शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा आहेत.

राज कुंद्रा प्रकरण असे कि, राजवर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, त्याच्याविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शिवाय राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे. शिवाय बिझनेस पार्टनरही आहे. पण तरीही त्याची थेट लिंक न सापडल्याने फेब्रुवारी २०२१ पासून पोलिसांचा तपस सुरु होता आणि आता ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असा आरोप लावण्यात आला आहे.