Take a fresh look at your lifestyle.

लग्नानंतर सगळं बदलून जातं..? सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो व्हायरल; काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल जो तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. अगदी शाळेतल्या मुलांपासून ते म्हाताऱ्या आज्जी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच सोशल मीडियाचं वेड लागलय. आपल्या आयुष्यात काय चालू आहे..? आणि दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे..? यासाठी सोशल मीडिया एकदम बेश्ट पर्याय. पण सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींची काही वेगळीच तऱ्हा पहायला मिळतेय. जो तो आपल्या लग्नाचे फोटो शेअर करतोय आणि आशीर्वाद मागतोय. सोबत लग्नानंतर सगळं बदलून जातं..? असे देखील म्हणतोय. आता राहीला प्रश्न हा कि नेमकं चाललंय तरी काय..?

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपर कुल अभिनेता अनिल कपूर यांनी आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे आणि सोईबत कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिलं आहे कि, या दिवशी तुम्ही आम्हाला भरपूर आशीर्वाद दिलात. तुमच्या याच आशीर्वादाची गरज आता माझ्या अन्य कुटुंबाला आहे. कारण लग्नानंतर सगळं बदलून जातं. याशिवाय बॉलिवूड अभिनेता वरून धवनने सुद्धा अशीच काहीशी पोस्ट केली आहे. आपल्या लग्नाचा फोटो शेअर करीत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, तुम्ही आम्हाला या दिवशी भरभरून प्रेम दिलात पण आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे कारण लग्नानंतर सगळं बदलून जातं.

तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील कॉमिक अभिनेता मनीष पॉल याने सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले आहे कि, सगळं बदललं या दिवसानंतर आणि आता पुन्हा बदलणार आहे.. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.

तसेच अभिनेत्री नितू कपूर यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, माझ्यासाठी लग्नानंतर सगळं बदललं. आता मी नव्या प्रवासाला सुरुवात करतेय आणि ते हि तुमच्या आशीर्वादाने ऋषी जी. तुम्ही माझ्या हृदयात कायम रहाल.

अशीच काहीशी पोस्ट अभिनेत्री कियारा अडवाणीने सुद्धा केली आहे. फक्त काय कि तीच लग्न न झाल्यामुळे तिने आई वडिलांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, माझ्या पालकांच्या फोटोंपैकी हा माझा आवडता फोटो आहे. एका परिपूर्ण लग्नाचे उदाहरण म्हणून मी त्यांच्याकडे नेहमीच पाहत आले आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.. आता मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे! तसेच, कृपया काही सल्ला द्या, कारण सगळे बोलतात लग्नानंतर सगळं बदलतं.. काय खरंच लग्नानंतर सगळं बदलत..?

एव्हढ्या पोस्ट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटण साहजिक आहे. सोबत खूप प्रश्नही पडले असतील. तर फार विचार करू नका. कारण यांपैकी कुणीही परत लग्न करत नाही आहे किंवा कुणाचाही पुनर्विवाह, विवाह होणार नाही. हे सगळं काही आगामी चित्रपट जाग जाग जियो’च्या प्रमोशनसाठी चालू आहे. होय. लग्नानंतर सगळं बदलून जातं.. असा एक समज आहे आणि यावरच भाष्य करणारा हा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या ज्या कलाकारांनी या पोस्ट केल्या आहेत तेच या चित्रपटाची स्टार कास्ट आहेत. या सर्व पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणार आहे.