Take a fresh look at your lifestyle.

BiggBoss 15’मधून अभिजित बिचुकलेची हकालपट्टी?; सलमानवर काढला सातारी जाळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस चा १५ वा सीजन सध्या कमाल चालू आहे. एकीकडे सगळे स्पर्धक जिंकण्याच्या प्रयत्नांत असताना दुसरीकडे टास्क एकापेक्षा एक खतरनाक होत चालले आहेत. हे सगळं एका बाजूला आणि अभिजित बिचुकले हे प्रकरण एका बाजूला. खरतर बिग बॉसची शान वाढवण्यासाठी बिचुकलेला बिग बॉसच्या घराचे द्वार खोलून दिले होते. मात्र ऐकेल तर शपथ.. अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक विकेंडला काही ना काही वाद राडे व्हायचे म्हणजे व्हायचेच. अखेर बिग बॉसच्या घरातून बिचुकलेची एक्झिट झालीच. पण यानंतर बिचुकले असं काही बरळल्याचे समोर आले आहे का काही विचारूच नका. त्यांनी सलमानवर अगदी सातारी जाळ काढला आहे.

बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकलेची एक्झिट झाल्यानंतर त्यांना स्वतःचा संताप काही आवरेनासा झाला आहे असेच दिसत आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर अभिजित बिचुकले म्हणाला कि, सलमान स्वतःला भाई समजतो पण मी दादा आहे. मी काय स्वतःहून बिग बॉसमध्ये गेलो नव्हतो. मला बोलावलं होत स्वतः बिग बॉसने. याशिवाय आपल्याला घरातून मुद्दाम बाहेर काढून टाकल्याचा आरोप देखील अभिजित बिचुकलेने केला आहे. याआधीसुद्धा अभिजित बिचुकले खड्ड्यात गेला तुमचा शो म्हणून निघून जातो असे बोलताना दिसला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कालच बिग बॉसने सांगितले होते कि घरातील कमकुवत खेळाडू बाहेर जाईल. दरम्यान कालच्या एपिसोडमध्ये, घरातील स्पर्धक सदस्यांपैकी अभिजित बिचुकले, देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मी देसाई हे नॉमिनेशन मध्ये आले होते. यानंतर मिडनाईट एव्हिक्शनमध्ये अभिजित बिचुकलेला घराबाहेर काढले आणि यानंतर त्याने प्रोडक्शन, चॅनेल, शो आणि मुख्य म्हणजे शो होस्ट सलमान खानवर ताडताड ताशेरे ओढले आहेत. आता बिचुकलेच्या विधानांवर सलमान खान प्रतिक्रिया देणे कितपत गरजेचे समजेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.