Take a fresh look at your lifestyle.

‘फास्ट अँड फ्युरियस’चा आजवरचा सर्वात चित्तथरारक चित्रपट ! श्वास रोखून ठेवायला लावणारा ट्रेलर पहा #F9

तिकीट टू हॉलीवूड । जगप्रसिद्ध फास्ट अँड फ्युरियसची फ्रँचाइजी तुम्हाला माहितीच असेल. एका पेक्षा एक थरारक ऍक्शनसाठी हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. वीन डिझेल हा ऍक्टर यात प्रमुख भूमिकेत दिसत असला तरी, ड्वेन जॉन्सन म्हणजेच रॉकची एन्ट्री झाल्यापासून चित्रपटाने प्रसिद्धीच्या साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत. चार चाकी गाड्यांपासून विमानापर्यंतची सर्व तुफान ऍक्शन यात भरलेली असते.

    या वेळी त्यात रॉक नसला तरी चित्रपटाबाबत तेवढीच उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. फास्ट अँड फ्युरियस च्या आधीच्या भागांना भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भारतातही हा चित्रपट पूर्ण जगासोबत रिलीज होणार आहे.