Take a fresh look at your lifestyle.

बनावट रेमडेसिव्हीर विकले जातेय बाजारात; सोफी चौधरीने केला खऱ्या खोट्याचा खुलासा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परिणामी कोरोना लसींचा तुटवडा जाणवतोय. अश्यावेळी सर्वात वाईट बाब अशी कि, बनावट रेमडेसिव्हिर विकले जात असल्याचे वृत्त येत आहे. देशात कोरोना लसींच्या तुडवड्यासह साठेबाजी आणि काळाबाजार सुरू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर दिसून येत आहे. रेमडेसिव्हिर, प्लाझ्मा थेरेपी कोरोनापासून बचावासाठी यशस्वी ठरत असताना देशातील अनेक राज्यांत याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अश्यावेळी बाजारात बनावट औषधांची आणि रेमडेसिव्हिरची विक्री धोक्याची घंटा दर्शविते. यासंदर्भात बॉलीवुड अभिनेत्री तसेच गायिका सोफी चौधरीने बाजारात विकल्या जात असणाऱ्या बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत विशेष माहिती दिली आहे.

अभिनेत्री सोफी चौधरीने आपल्या आधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला बनावट रेमडेसिव्हिर आणि दुसऱ्या बाजूला ओरिजिनल रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिसत आहे. या फोटोत इंजेक्शनच्या स्पेलिंगसह कोणते ओरिजिनल आणि कोणते बनावट आहे, हे स्पष्ट स्वरूपात सांगण्यात आले आहे. या फोटोसह सोफी चौधरीने लोकांना बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सोफीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘हे होत आहे आणि हे लज्जास्पद आहे. कृपया सावध राहा आणि लक्ष ठेवा #RemdesivirBlackMarketing #Remdesivir #fake’ सोफीचे हे ट्विट सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या ट्विटला लाईक देत समर्थन केले आहे. तसेच अनेक जण कमेंट करून याबाबत प्रतिक्रियाही देत आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी अनेक रुग्णांचे नातलग दिवसभर भटकत आहेत. कारण देशभरात या इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. अश्यावेळी बनावट रेमडेसिव्हीर बाजारात विकणे हे प्रकृती नव्हे तर विकृतीचा भाग आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.