Take a fresh look at your lifestyle.

Fake महिला लिडर; टास्कमध्ये महिला सदस्यांवर कचरा टाकणाऱ्या तृप्ती देसाईंवर टीकांचा मारा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महिलांच्या बाजूने आवाज लागवणाऱ्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत बोलणाऱ्या आणि महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सडेतोड आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांच्या नेत्या तृप्ती देसाई सध्या बिग बॉस मराठीच्या घरात दिसत आहेत. या घरात प्रवेश केल्यापासून त्या सतत विविध मुद्द्यांमुळे चांगल्याच चर्चेत येताना दिसत आहेत. अलिकडेच ‘बिग बॉसचा आवाज स्त्रीचा हवा’, असंहि वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आलेल्या. पण यानंतर आता त्यांनी एका टास्क दरम्यान घरातील महिलावर कचरा टाकल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.

मुख्य म्हणजे, महिलावादी तृप्ती देसाई ज्या नेहमी महिलांच्या बाजूने बोलताना दिसतात त्या टास्कदरम्यान इतक्या वाहत गेल्या कि, थेट महिला सदस्यांच्या अंगावर कचरा फेकला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणामी तृप्ती देसाईंवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत हे त्यांच्या कमेंट्समधून लक्षात येत आहे. हल्ला बोल या टास्कमध्ये सुरेखा – सोनालीची जोडी मोटर बाईकवर बसली असताना त्यांना बाईकवरुन उठवण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमने या दोघींच्याही अंगावर कचरा, साबणाचं पाणी फेकलं. इतकंच काय तर, या सगळ्यांत तृप्ती देसाईंचा मोठा सहभाग होता. त्यांनी दादूसच्या मदतीने घरातील कचरा आणला आणि सरळ सुरेखा- सोनालीच्या अंगावर टाकला. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर तृप्ती देसाई ट्रोल होताना दिसल्या.

 

 

ट्रोलिंगला आधी काही सुरुवात झाली आहे कि, आता काही केल्या लोक त्यांना माफी द्यायला तयार नाही. ‘महिलांसाठी लढणाऱ्या तृप्ती ताई आता महिलांवरच कचरा फेकत आहेत’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ‘तृप्ती ताई जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिसतायेत’, ‘महिलांची लीडर महिलांवर कचरा फेकते. काय तत्व पाळतायत?’ Fake महिला लिडर, असाही उपहासात्मक टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे. याशिवाय हा तृप्ती ताई आहे कि दादा? असं म्हणत अनेकांनी तृप्ती देसाईंना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल केलं आहे.