Take a fresh look at your lifestyle.

अखेर तारखांचा गोंधळ मिटला आणि ‘फॅमिली मॅन २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फॅमिली मॅन या वेब सीरिजच्या यशानंतर लोक अक्षरशः त्याच्या दुसऱ्या भागाची आ वासून वाट पाहत होते. त्यानंतर फॅमिली मॅन २ येणार अशी बातमी आली. पण प्रदर्शनाची तारीख काही आली नाही. गेले कितीतरी दिवस या दुसऱ्या सीजन बाबत निव्वळ चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांसोबत प्रदर्शनाच्या तारखेने नुसता गोंधळ उडविला होता. यामुळे प्रेक्षकांनी जरा नाराजीचा सूर लावला होता. खरं तर ‘फॅमिली मॅन २’ फेब्रुवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता, पण काही कारणास्तव याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. पण आता प्रतीक्षा संपली आहे कारण १९ मे २०२१ रोजी याचा ट्रेलर रिलीज होणार आहे. अर्थातच या वेब सिरींजचा दुसरा भाग लवकरच येणार हे नक्की.

या वेब सिरीजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत झळकला होता. यामुळे मनोज बाजपेयीच्या चाहत्यांसोबतच तमाम रसिक प्रेक्षकांना ‘फॅमिली मॅन २’ ची प्रतिक्षा आहे. ‘फॅमिली मॅन’ च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर ‘फॅमिली मॅन २’ची तयारी लगेचच सुरू करण्यात आली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. त्यामुळे दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून रसिकांची उत्सुकता वाढली आहे. पण आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी न ताणता हा ‘फॅमिली मॅन’ रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ मे २०२१ रोजी ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थरार, रोमांच आणि ह्युमरचा अनोखा संगम असणाऱ्या या वेब सिरीजच्या ट्रेलरबाबत देखील प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ११ जून २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर ही वेब सिरीज प्रदर्शित करण्याची योजना आहे, असे सांगितले जात आहे. मात्र तरीही प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर रिलीज डेटही घोषित करण्यात येईल असे समजत आहे. ‘फॅमिली मॅन २’मध्ये श्रीलंकेतील लिट्टेशी निगडीत कथानक पहायला मिळणार आहे.