Take a fresh look at your lifestyle.

खलनायक गाजवणारे अभिनेते सलीम घौस काळाच्या पडद्याआड

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्गज भारतीय अभिनेता आणि छोट्या पडद्यावर मोठी कारकीर्द असलेले लोकप्रिय अभिनेते सलीम घौस यांचे निधन झाले आहे. गुरुवारी दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण सिने सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांचे निधन झाल्याच्या वृत्तास अभिनेता शारिब हाश्मी यांनी दुजोरा देत ट्विट केले आहे. अभिनेता सलीम घौस यांनी १९७८ सालामध्ये स्वर्ग नरक या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत सुरुवात केली होती.

अभिनेता सलीम घौस यांच्या निधनाची माहिती देताना अभिनेता शारीब हाश्मी यांनी ट्विट केले आहे. हे ट्विट करताना शारीब यांनी सलीम याना आदारांजली वाहताना लिहिले आहे कि, ‘पहिल्यांदा मी सलीम घौस यांना सुबह या मालिकेत पाहिलं. त्यांचं काम मला खूप आवडलं होतं. त्यांचा आवाज तर…(हार्ट इमोजी)’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सलीम घोष यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नीने याबाबतची माहिती देताना सांगितले कि, बुधवारी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. म्हणून त्यांना काल रात्री कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु होते मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि सकाळी (२८ एप्रिल) त्यांचे निधन झाले.

सलीम घौस यांनी फक्त हिंदी चित्रपटसृष्टी नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘कोयला’, ‘शपथ’, ‘अक्स’, ‘त्रिकाल’, ‘द्रोही’, ‘सारांश’ आणि ‘स्वर्ग नरक’ या चित्रपटांमध्ये ते दिसले होते. वेल डन अब्बा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. सलीम आपल्या खलनायकी भूमिकेमुळे विशेष ओळखले जायचे. त्यांनी चक्र, सारांश, मोहन जोशी हाजीर हो, यांसारख्या सिनेमांमध्येही विविध भूमिकांमध्ये काम केले आहे. तर मंथन, कलयुग, त्रिकाल, आघात, द्रोही, थिरुदा, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये तसंच भारत एक खोज, टिपू सुल्तान, कृष्णा, वागले की दुनिया यांसारख्या मालिकांमध्येही ते दिसले होते.