Take a fresh look at your lifestyle.

दुःखद! प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचं दीर्घकालीन आजारामुळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद अशी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचं दीर्घकालीन आजारामुळे निधन झालं आहे. दरम्यान ते ८४ वर्षांचे होते. माहितीनुसार, मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी या रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांच्या निधनाची बातमी मिळताच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण पसरले आहे. बागबान या भावनिक आणि लोकप्रिय चित्रपटाचे लेखन शरीफ अन्सारी यांनीच केले होते.

सूत्रानुसार, गेल्या काही दिवसांपासून शफीक अन्सारी यांची प्रकृती अस्थिर होती. ते बरेच दिवस आजारी होते. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्यांचा मुलगा मोहसीन अन्सारी यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘बागबान’ या लोकप्रिय चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शफीक यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवारातील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शफिक यांनी १९७४ सालामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी ‘दोस्त’ या चित्रपटाची पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहिली होती. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुख्य भूमिका होती. यानंतर १९९० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या ‘दिल का हीरा’ चित्रपटासाठीसुद्धा त्यांनी स्क्रिप्ट लिहिली. त्यानंतर २००३ साली प्रदर्शित झालेल्या आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘बागबान’ या चित्रपटासाठी शफिक यांनी लेखन केलं होतं. या हित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट आणि त्याची कथा प्रचंड गाजली होती.