Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध दिग्दर्शकाची होळी झाली बेरंग; 17 वर्षीय लेकाचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘तोरबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांच्या कुटुंबावर अतिशय दुःखद प्रसंग ओढवला आहे. होळीचा रंग आयुष्यात विविध रंग आणतो. पण यंदाच्या होळीने मलिक यांचे आयुष्य रंगहीन केले आहे . गिरीश मलिक यांच्या मुंबईतील अंधेरीस्थित घराच्या पाचव्या मजल्यावरून त्यांचा 17 वर्षीय मुलगा मनन खाली पडल्यामुळे त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कुटुंबीयांनी मननला तातडीने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याने अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

मननचा अपघात होळीच्या दिवशीच घडला आणि यामुळे मलिक यांची होळी बेरंग झाली. हा घडलेला संपूर्ण प्रकार अतिशय भयानक होता. मननच्या अपघातामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलीस तपासानुसार अद्याप हा प्रकार अपघात होता की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गिरीश मलिक यांच्या 17 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर मलिक कुटुंबियांच्या दुःखात समस्त बॉलिवूड परिवार सामील झाला आहे. त्यांचे मित्र आणि इंडस्ट्रीतील लोकांनादेखील हा प्रकार अतिशय धसका देऊन गेला आहे. तर सोशल मीडियावर ही बातमी पसरल्यानंतर नेटकरीदेखील गिरीश मलिक यांचे सांत्वन करत आहेत.

 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अंधेरी पश्चिम येथील ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये ही घटना घडली. मलिक हे ए- विंगमध्ये राहतात. रिपोर्टनुसार, मनन दुपारी होळी खेळायला गेला होता. आणि काही वेळाने परत आला. घरी परतल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातानंतर मननला रुग्णालयात नेले होते. परंतु रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेची माहिती देताना ‘तोबराज’ चित्रपटातील गिरीश मलिक यांचे पार्टनर पुनीत सिंह म्हणाले की, मलिक यांच्या मुलाचे निधन झाले आहे. याशिवाय हे सर्व कसे घडले याबद्दल मी तुम्हाला अधिक काही सांगू शकत नाही.