Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक जॉन पॉल यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीमधून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत गेली अनेक वर्षे जिद्दीने आणि स्फूर्तीने कार्यरत असणारे ज्येष्ठ मल्याळम निर्माते आणि लेखक जॉन पॉल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. निर्माते जॉन पॉल यांनी शनिवारी दुपारी ०१.००वाजता केरळमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि हे वृत्त सिनेसृष्टीला चटका लावणारे होते.

खात्रीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते जॉन पॉल हे गेल्या २ महिन्यांपासून केरळमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि शनिवारी उपचारांचा काहीही फायदा न झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्माते जॉन पॉल यांच्या उपचारासाठी त्यांच्या मित्र मंडळीसह हितचिंतकांनीदेखील अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पैसे उभे केले होते. यावेळी केरळ सरकारनेही पुढे येऊन २लाख रुपयांची मदत केली होती. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. काळ आला होता आणि त्याने घाला घातलाच. त्यांच्या निधनानंतर चित्रपट जगतातील लोकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान मल्याळम अभिनेता कुंचाको बोबनने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक पोस्ट शेअर करून जॉन पॉल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, ‘त्यांनी अनेक आत्मास्पर्शी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ते सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील.” जॉन पॉल यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपट लिहिले आहेत. तर यातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. नाम चमाराम, यात्रा आदी चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. एवढेचं नव्हे तर त्यांनी भारतन, सत्यन एंथिक्कड़ आणि जोशी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबतही काम केले.