Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेता पुनीथ राजकुमार यांचे हार्ट अटॅकमूळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात आनंदापेक्षा जास्त दुःखद बातम्यांनी सपाटा लावल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत अनेको कारणांनी सिनेसृष्टीने कित्येक कलाकार गमावले आहेत. दरम्यान आता एका धक्कादायक घटनेत, लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेता पुनीथ राजकुमार याचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान पुनीथ राजकुमार ४६ वर्षाचे होते. माहितीनुसार सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना बंगळूरच्या खाजगी रुग्णालयात भरती केले होते. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे अपडेट येत असतानाच अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाचे म्हणजे फिटनेसची आवड असणारा अभिनेत्याचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन होणे हि बाब अतिशय धक्कादायक आहे. रिपोर्ट्सनुसार, कन्नड सुपरस्टार पुनीथ राजकुमार जिममध्ये वर्कआउट करताना कोसळले होते. यानंतर त्यांना बंगळूरमधील विक्रम या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याचे समजले. पुनीथ राजकुमार याना हार्ट अटॅक आल्याची बातमी समजताच विक्रम रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला नव्हता. मात्र काही वेळाने हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुनीथ राजकुमार आपल्यात नाहीत हे त्यांच्या चाहत्यांना सहन झाले नाही.

दरम्यान बंगळूरच्या विक्रम रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे कि, पुनीत राजकुमार यांना सकाळी 11.40 वाजता आपत्कालीन विभागात आणण्यात आले. तो नॉन-रिस्पॉन्सिव्ह होता आणि कार्डियाक एसिस्टोलमध्ये होता आणि प्रगत कार्डियाक रिसिसिटेशन सुरू केले गेले आहे. फिटनेस फ्रीक आणि युवारत्न अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ही खरोखरच त्यांच्या चाहत्यांसाठी तसेच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक बातमी आहे.

पुनीथ राजकुमार हे १७ मार्च १९७५ रोजी जन्मले आणि त्यांना अप्पू म्हणून ओळखले जायांचे. त्यांनी २९ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते; लहानपणी ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले. यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. संतोष आनंदद्रम दिग्दर्शित आणि विजय किरगंदूर निर्मित होंबळे फिल्म्स या बॅनरखाली बनलेल्या युवारथनामध्ये शेवटचे पुनीथ दिसले होते. सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली देत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.