मराठी सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि कुटुंबाला कोरोनाची लागण
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाच कहर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा जीवही गेला आहे. सर्वसामान्य माणसापासून ते अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
“मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया.” असं ट्विट करुन सुबोधने करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे.
तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत.
तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020
देशात मागील काही आठवड्यांपासून ७० हजार ते ८० हजारांच्या सरासरीनं दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यानं हा दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात करोनाची स्थिती आणखी बिकट होत असल्याचेच आकडेवारीतून दिसून आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’